बाल सुरक्षा धोरण
अल्पवयीन वापरकर्त्यांच्या सुरक्षेबाबतचे आमचे धोरण, आणि बाल शोषणविषयक मजकुराबाबत आमची शून्य-सहनशीलता.
Update 7 सप्टेंबर 2026
अंमलात येण्याची तारीख: या पानावर शेवटी अद्ययावत केल्याची तारीख दिली आहे.
स्पर्धा परीक्षा फाउंडेशन चे हे धोरण आमचे संकेतस्थळ आणि MahaTest, MPSC PYQ App व MahaPolice Prep या तिन्ही App ना लागू आहे. Google Play च्या Child Safety Standards धोरणानुसार हे प्रसिद्ध केले आहे.
१. शून्य सहनशीलता
बाल लैंगिक शोषण किंवा अत्याचार दर्शवणारा (CSAE) कोणताही मजकूर आमच्या कोणत्याही सेवेवर पूर्णपणे निषिद्ध आहे. यात हे सर्व येते:
- अल्पवयीन व्यक्तीचे लैंगिक स्वरूपाचे कोणतेही चित्र, चलचित्र किंवा वर्णन
- अल्पवयीन व्यक्तीशी लैंगिक हेतूने संपर्क साधण्याचा प्रयत्न (grooming)
- अल्पवयीन व्यक्तीच्या शोषणाचा किंवा तस्करीचा कोणताही प्रकार
- असा मजकूर कुठे मिळेल याची माहिती देणे किंवा त्याचे समर्थन करणे
असा मजकूर आढळल्यास तो तात्काळ काढला जातो, संबंधित खाते कायमचे बंद केले जाते, आणि प्रकरण कायद्यानुसार संबंधित यंत्रणेकडे कळवले जाते. यात कोणताही अपवाद नाही आणि इशारा दिला जात नाही.
२. आमच्या सेवांचे स्वरूप
आमच्या सेवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आहेत — अभ्यास साहित्य, सराव प्रश्न आणि परीक्षांची माहिती. आमचे वापरकर्ते प्रामुख्याने १८ वर्षांवरील उमेदवार आहेत, कारण जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांना किमान वयोमर्यादा १८ किंवा त्याहून अधिक आहे.
तरीही, काही विद्यार्थी १८ वर्षांखालील असू शकतात — विशेषतः जे लवकर तयारी सुरू करतात. म्हणून हे धोरण आहे.
३. वयाबाबतची अट
- खाते तयार करण्यासाठी किमान वय १३ वर्षे आवश्यक आहे.
- १८ वर्षांखालील वापरकर्त्यांनी पालक किंवा कायदेशीर पालकाच्या संमतीनेच खाते वापरावे.
- १३ वर्षांखालील मुलाची माहिती आम्ही जाणूनबुजून गोळा करत नाही. तशी माहिती चुकून मिळाल्याचे लक्षात आल्यास ती तात्काळ नष्ट केली जाते.
४. तक्रार कशी करावी
अल्पवयीन व्यक्तीच्या सुरक्षेशी संबंधित काहीही आढळल्यास ताबडतोब कळवा:
- ईमेल: safety@spardhavahini.com
- किंवा संपर्क फॉर्म
अशा तक्रारींना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्या इतर तक्रारींच्या रांगेत ठेवल्या जात नाहीत.
५. भारतातील अधिकृत यंत्रणा
गुन्हा घडला असल्याची शंका असल्यास आमच्याकडे तक्रार करण्यासोबतच थेट यंत्रणेकडेही कळवा — त्यांच्याकडे कारवाईचे अधिकार आहेत, आमच्याकडे नाहीत:
- राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल — cybercrime.gov.in
(इथे "Report Crime related to Women/Child" हा वेगळा विभाग आहे, आणि तिथे नाव न देताही तक्रार करता येते) - चाइल्डलाइन — १०९८ (२४ तास, मोफत)
- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) — ncpcr.gov.in
- तातडीच्या प्रसंगी — ११२
६. आम्ही काय करतो
- प्रकाशित होणारा सर्व मजकूर आमच्या टीमकडून तपासला जातो — तो आपोआप प्रसिद्ध होत नाही.
- वापरकर्त्यांनी टाकलेला कोणताही मजकूर तपासणीनंतरच दिसतो.
- अपलोड होणाऱ्या फाईली तपासल्या जातात.
- तक्रार आल्यास तो मजकूर तपासणीपर्यंत लपवला जातो — आधी काढा, मग तपासा.
- कायदेशीर यंत्रणेने माहिती मागितल्यास आम्ही पूर्ण सहकार्य करतो.
७. Google Play
हे धोरण Google Play च्या Child Safety Standards ला अनुसरून आहे. आमच्या तिन्ही App साठी हेच धोरण लागू आहे, आणि Play Console मध्ये याच पानाचा दुवा नोंदवलेला आहे.
या पानाबाबत काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधा. संपर्क